नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर माथेरान नाका येथे हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे. हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याचे प्रसार आणि प्रचार ही संस्था २००५ पासून करीत आहे. तेथील हुतात्मा चौकात १४ ऑगस्टची मध्यरात्र उलटल्यानंतर १५ ऑगस्टला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या प्रहरी म्हणजे १२ वाजून एक मिनिटांनी राष्ट्रीय झेंडा तिरंगा फडकावून स्वातंत्र दिन साजरा केला जात असतो. यावर्षी भारतीय सेनादलातील निवृत्त जवान थळ सैनिक अर्जुन रमेश शिंदे यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकविला. यावेळी निवृत्त थळ सैनिक अर्जुन शिंदे आणि किरण कांबरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.नेरळचे सरपंच उषा पारधी,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे,महिला पोलिस निरीक्षक तसेच चिंचवली ग्रामपंचायत उप सरपंच सुप्रिया भगत तसेच डॉ हेमंत शेवाळे,माजी उप सरपंच सुमन लोंगले,माजी सदस्य श्रद्धा कराळे,संतोष शिंगाडे,जयवंत साळोखे,भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत,महिला तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर,युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय गवळी,मनसे तालुका उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ, शिवसेना ठाकरे गट तालुका उप संघटक सुधाकर देसाई शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,शिक्षक सेना तालुका अध्यक्ष संतोष कांबरी तसेच माजी मुख्याध्यापक प्रकाश राठोड आदी मान्यवरांसह नेरळ आणि परिसर मधील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते…
या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात नेरळ परिसरात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी विद्या विकास मंदिर शाळॆची श्रुती जगदीश झांजे हि विद्यार्थिनी ९७.५० टक्के गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल तसेच आफ्रिका देशात झालेल्या आशियाइ आफ्रिकन पॅसिफिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल अमृता ज्ञानेश्वर भगत हीच देखील विशेष सन्मान करण्यात आला…. देशाच्या संरक्षण सेवेत १७ वासारखे देशसेवेची कामगिरी करून निवृत्त झालेलले किरण कांबरी आणि अर्जुन शिंदे यांच्या वाणीतून देशाच्या सीमेवर घडलेले प्रसंग आपल्या भाषणातून प्रकट केले.हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे तसेच संदेश साळुंके, किशोर गायकवाड, महेश भगत,सतीश पाटील, बंटी शिर्के यांनी सर्वांचे स्वागत केले.तर प्रवस्तविक दिलीप बोरसे आणि राजू वाघरे यांनी केले. नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नी. शिवाजी ढवळे. पो.उप.नी. पांगे मॅडम, सरपंच सौ. उषा पारधी, प्रथमेश मोरे,भाऊ क्षीरसागर,भाई देसाई, जयवंत पारधी सर, तसेच अन्य मान्यवर व नेरळ येथील प्रतिष्ठित देश प्रेमी उपस्थित होते…हुतात्मा चौकातून रात्री अकरा वाजता मशाल फेरी देखील काढण्यात आली. विश्वजितनाथ आणि टीमने या मशाल फेरीचे नेतृत्व केले. हुतात्मा चौकातून कल्याण रस्त्याने धरण आणि तेथून ग्रामपंचायत येथून कुंभार आळी शिवाजी महाराज चौक आणि तेथून हुतात्मा हिराजी पाटील चौकातून पुन्हा हुतात्मा चौक अशी मशाल फेरी काढण्यात आली.