खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वादात आणि चर्चेत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी सध्या खोपोली-खालापूर येथील मुस्लिम समाजातर्फे जोर धरत आहे…भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवार दिनांक १ सप्टेंबर 2024 रोजी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या एका कार्यक्रमात मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चिन्ह आहेत…नितेश राणेंवर भारतीय न्याय संहिता कलम 192, 196, 197, 299, 302, 353 (2 ), 356 (2) आणि 356 (3) अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे… कोणताही धर्म इतर धर्माबाबत टीका करण्याचे शिक्षण देत नाही तसेच मुस्लिम समाज प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि पूर्वीपासून करीत आलेला आहे…परंतु सध्या धर्माचे राजकारण चालू असून धार्मिक भावना भडकावून जातीय दंगली होण्याची दाट शक्यता आहे… समाजात जातीय दंगली होऊ नये…शांतता व सलोख्याचे वातावरण भारतीय संस्कृतीची विविधतेतून एकतेची प्रतीक आहे. त्या संस्कृतीचे रक्षण व्हावे व समाजात दंगली होऊन सामाजिक नुकसान होऊ नये याकरिता आपण आमदार नितेश राणे यांच्यावर धार्मिक भावना दुखाण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारण, धार्मिक भावना भडकावणे, धर्मावरून गटांमधील वैर वाढवणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे याकरिता त्वरित कार्यवाही करावी… नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी… अशी मागणी खोपोली खालापूर येथील मुस्लिम समाजातर्फे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे करण्यात आल्याचे डॉ. पठाण यांनी सांगितले