पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया या… जयघोषात रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे… नवी मुंबई,पनवेलमध्ये गणपतीचे वाजतगाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत,पारंपरिक गाण्याच्या तालावर फेर धरत आगमन झाले… राजकीय पक्षाचे नेते,मंत्री, पदाधिकारी यांच्या घरी देखील सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्ये जपत गणपती स्थापन झाले…त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या पाले बुद्रुक येथील गोविंद निवासस्थानी बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली…परिसरात तांडेल कुटूंबियांचा कौटुंबिक बाप्पा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे…यावेळी पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल,तालुका प्रमुख संदीप तांडेल यांनी परिसरातील जनतेला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या…तांडेल कुटूंबियांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना गणरायाच्या आगमनाबाबत आनंद व्यक्त केला…शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांनी जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष वाढत आहे…तो तसाच राज्यभर वाढावा आणि सर्वांचे लाडके उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे गणरायाच्या चरणी घातले…यानंतर जिल्हाप्रमुख शिरीषदादांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या…