वरंध गावातील श्रीधर वाड्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन…

0
132

महाड शिवसत्ता टाइम्स ( निलेश लोखंडे ) :-

महाड तालुक्यातील वरंध गावामध्ये सालाबादप्रमाणे श्रीधर वाड्यामध्ये अत्यंत उत्साहात ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. 21 पिड्यांपासून हा गणपती वरंध पंचक्रोशीत मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला असला तरी या वाड्यामध्ये साडे तीनशे वर्षांपूर्वी पासून सार्वजनिक गणेशोत्सव वरंध गावात, वरंध पंचक्रोशीत साजरा केला जातो. याही वर्षी वरंध पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गणरायाच्या आगमणाची जय्यत तयार केलेली पाहावयास मिळाली…