चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया …पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोषात साश्रुनयनांनी रायगड जिल्ह्यातील चौक परिसरात गणेशभक्तांनी उत्साही वातावरणात दीड दिवसांच्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला…रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी वाजत गाजत उत्साहात भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले गेले… दिड दिवसांनी निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.चौक परिसरातील गावांत आलेले गणपती बाप्पांची भाविकांनी दिड दिवस अतिशय उत्साही वातावरणात आनंदात विधिवत पूजा अर्चा केली.रविवारी सायंकाळी उशिरा गणराय आपल्या घरी निघाले असता अनेकांनी साश्रू नयनांनी बाप्पाला अखेरचा निरोप दिला. मोरबे धरणाची उपनदी धावरी हिला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील गावातील गणपती धावरी नदीच्या गणेश घाटावर आणण्यात आले होते. ग्रूप ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी घाट परिसर स्वच्छ ठेवला होता. निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश तयार ठेवले होते,तर लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली होती…गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी भावपूर्ण हाक मारून दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला…