इंदापूर शिवसत्ता टाइम्स (गौतम जाधव):-
कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्सवात व धूम धड्याक्यात सुरू झाला असून कोकणातील घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे…रायगडच्या माणगाव तालुक्यातील साले गावामध्ये गेल्या अनेक पिढ्यान पिढ्या एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही…तरी देखील येथे गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जात आहे…शनिवार दि.७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता साले गावाने अनेक वर्षांची ही परंपरा आबाधित ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला…जवळपास सव्वाशे ते दिडशे उंबरऱ्याच्या गावात एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही…गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व मुंबई चाकरमणी हे गावाला येत असतात…तसेच सर्व ग्रामस्थ हे गावातील स्वयंभू शिव गणेश मंदिरात जमून, भजन, किर्तन, आरती करतात…त्यानंतर मंदिराच्या शेजारी असलेल्या गंगा सागर तलावातून या पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढून सर्व गावातून फिरवतात…
गणेशत्सवाला गावातील माहेर वाशीणी ,सासर वाशीणी, महिलावर्ग गंगा सागर तलावातून पालखी मिरवणूक जात असताना तलावाच्या बाजूने हातात तांदूळ घेऊन उडवतात…गावातून पालखी मिरवणूक फिरत असताना प्रत्येक घरातील महिला वर्ग या पालखीची मनोभावे पूजा करतात…खालू बाजा लेझिमच्या ठेक्यावर तरूण तरूणी नाच गाणी करून मोठ्या आनंदाने ही पालखी मिरवणूक परत स्वयंभू शिव गणेश मंदिरात नेऊन तिची सांगता करतात…हा आगळा वेगळा पालखी सोहळा पाहण्यासाठी माणगांव पंचक्रोशीतील भक्त भाविक देखील मोठ्या संखेने उपस्थित होते…