Tuesday, December 10, 2024
Homeपनवेल / उरण / रायगड१९३० सालच्या हुतात्मा शिल्प स्मारकांची दुरावस्था... नाही दिवा,नाही पणती अशा अवस्थेत हुतात्मा...

१९३० सालच्या हुतात्मा शिल्प स्मारकांची दुरावस्था… नाही दिवा,नाही पणती अशा अवस्थेत हुतात्मा स्मारके… हुतात्मा स्मारकांची दुरावस्था महाराष्ट्राला शोभा देणारी नाही 

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील): 

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या पुतळ्याची (शिल्प स्मारकांची) तसेच हुतात्मा स्मारकाची सध्या पडझड आणि दुरावस्था सुरू झाली आहे…त्यामुळे नागरिकांमध्ये,पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे…तरी सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे त्यांचे पडसाद संपूर्ण देशात उमटले,त्यासारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शिल्प स्मारकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा…अशी मागणी चिरनेर गावाला भेट देणारे पर्यटक नागरिक व्यक्त करीत आहेत…
ब्रिटिश सत्तेविरोधात उरण,पनवेल तालुक्यातील जनतेने चिरनेरच्या भूमीत २५ सप्टेंबर १९३० साली शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारले…यावेळी ब्रिटिश सरकारच्या जुलमी पोलीस यंत्रणेने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला… या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर,नांग्या महादू कातकरी (चिरनेर),रघुनाथ मोरेश्‍वर न्हावी ( कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई),आनंदा माया पाटील (धाकटी जुई),परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ आंदोलनकर्त्यांना वीरमरण प्राप्त झाले…तसेच ३८ आंदोलनकर्ते जखमी झाले होते…
स्वातंत्र्य संग्रामातील या गौरव व तेजस्वी लढ्याचे स्मरण युवा पिढीला व्हावे यासाठी चिरनेर गावातील स्मुती स्तंभा समोर हुतात्मा स्मारकांची व हुतात्म्यांच्या पुतळ्याची (शिल्प स्मारकांची) उभारणी करण्यात आली…परंतु प्रशासनाला चिरनेर,दिघोडे,धाकटी जुई,मोठी जुई,कोप्रोली,पाणदिवे,खोपटा या ७ स्मारकांकडे व हुतात्म्यांच्या पुतळ्यांकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळच मिळत नाही…त्यामुळे हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली असून परशुराम रामा पाटील या हुतात्म्यांच्या हातातील साहित्य निखळून पडला आहे…तसेच इतर हुतात्म्यांच्या हातातील ध्वजाची,अंगावरील कपड्यांची पडझड सुरू झाली आहे…तरी हुतात्म्यांच्या स्मारकांना,हुतात्म्यांच्या पुतळ्याना नवा लूक प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा…अशी मागणी इतिहास प्रसिद्ध गावात ये-जा करणारे पर्यटक नागरीक करत आहेत…
२५ सप्टेंबर २०२४ रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी शासकीय मानवंदना देऊन रायगड जिल्हा परिषद,पंचायत समिती उरण,चिरनेर ग्रामपंचायत व नवीमुंबई पोलीस यंत्रणा साजरा करणार आहे…तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शिल्प-स्मारक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून,गावाला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार द्यावा…अशी मागणी करण्यात आली…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments