माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
नोकरी व व्यवसायानिमित्त जपानमध्ये स्थिरावलेल्या भारतीयांचे योकोहामा मंडळ आहे… या मंडळातर्फे दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, दिवाळी, गरबा असे सण साजरे होतात… तसा गणपती उत्सवही साजरा होतो… यावर्षी २०२४ साली १४ ते १६ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस गणपती उत्सव साजरा झाला… या गणपतीला अयोध्येतील राम मंदिराचा देखावा तयार करण्यात आला होता… या देखाव्यातच हनुमान द्रोणागिरी पर्वत आणतो… असे चलचित्र साकारण्यात आले होते… पहिल्या दिवशी मिरवणुकीने गणपती आगमन… दुसऱ्या दिवशी महाप्रसाद कार्यक्रम… तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम… असे उत्सवाचे स्वरूप होते… उत्सवाचा आनंद जपानी नागरिकांनीही घेतला… याकोहामा शहराच्या मिडोरी वार्डाचे प्रमुख श्री.साईतो एका मोठ्या भारतीय कंपनीच्या सीईओसह हजर होते… उत्सवा दरम्यान झालेला… भारत कलानुभव-विविधतेत एकता… हा कार्यक्रम सर्वांगसुंदर होता… गणपतीचे विसर्जन करताना अनेकांचा कंठ दाटून आला… साश्रू नयनांनी जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी गणपतीला अखेरचा निरोप दिला…