रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने रसायनी पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी सकाळी १० वाजता ते १:३० वाजण्याचे दरम्यान मौजे वासांबे – मोहपाडा, वावेघर, आपटा या गावामध्ये रूटमार्च काढण्यात आला… रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांच्यासह रसायनी पोलीस स्टेशनचे १२ अंमलदार तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या ४५ जवानांचा समावेश होता… सदरच्या रूटमार्चला मोहोपाडा येथील अचानक मैदानपासून सुरुवात झाली… पुढे मोहोपाडा पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहोपाडा येथील मुख्यबाजारपेठ, नवीन पोसरी,दांड आपटा रोड वरून पुन्हा अचानक मैदान… पुढे वावेघर बस स्टॉप-वावेघर गावातून-रायगड जिल्हा परिषद शाळा, संत सेवालाल महाराज मंदिर, जामा मशीद – वावेघर आपटा-रोड पेट्रोल पंपावरुन मौजे आपटा बस स्टॉप-जुना कोळीवाडा-मुस्लिम मोहल्ला-जाम मज्जिद-पिंपळ आळी-बस स्टॉप असा रूट मार्च करण्यात आला… विधानसभा निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडाव्यात तसेच कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज
आहे…