श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून दिग्गज उमेदवार निवडणूक लढत आहेत… महाविकास आघाडी आणि महायुती असे लढाईचे चित्र स्पष्ट असले तरी कोण कोणाच्या विरोधात? आणि कोण कोणाच्या बाजूने? हे चित्र ४ नोव्हेंबर नंतर स्पष्ट होणार आहे… सोमवार दि.28 ऑक्टोबर 24 रोजी एकूण तीन नामनिर्देशपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.महेश पाटील यांचेकडे दाखल झाली. 1) श्री.संतोष तानाजी पवार (रा.लेप)हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असून त्यांनी यापूर्वीही एकदा अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली होती… (2) कृष्णा कोबनाक हे बळिराजा सेनेचे उपाध्यक्ष असून पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे व तद्नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत… त्यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे… (3) तिसरे उमेदवार राजेंद्र मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे असून अलिबागचे आहेत… ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत…
193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून यापूर्वीच महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे… 29 ऑक्टोबर या अखेरच्या दिवशी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून अनिल नवगणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे…. अनिल नवगणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते…