रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत…रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील चैन,मंगळसूत्र चोरून चोरटे पसार होण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत… या सर्व घटना असताना रोह्यात पुन्हा एक धक्कदायक प्रकार घडला आहे… मैत्रिणीचा बापच या प्रकरणात चोर निघाला आहे… या चोराने आपल्या मुलीच्या मैत्रीणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरली..मात्र मुलीने आरडाओडा करताच आजूबाजूला असलेले तरुणांनी पाठलाग करून चोराला पकडले…त्यामुळे चोरटा पळून जाण्यात अयशस्वी ठरला…वरसे बस स्टॉपवर दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली…या चोरट्याने सोन्याची चैन गळ्यातून खेचल्याने मुलीच्या मानेवर जखम झाली आहे…पकडलेल्या आरोपीचे नाव परेश हरीश कोरे वय 50 असून तो गंगा संगम अपार्टमेंट वरसे येथे राहत होता… सदर घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला देऊन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले… या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोसई खतीब करीत आहेत…