दुरशेत फाट्यावर बॅगेत सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतत मृतदेह… पेण पोलीस घटनास्थळी दाखल…परिसरात खळबळ…  

0
38

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):- 

मुंबई-गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील दुरशेत गावच्या फाट्यावर नदीकाठी एका बॅगमध्ये 30 ते 35 वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला असून परिसरात खळबळ माजली आहे. पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सदर परिसरातील ही दुसरी घटना असून याआधी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह इथे आढळला होता. त्यानंतर इथेच नदीपात्रात नवी मुंबई हत्याकांड प्रकरणातील 3 बंदूक देखील मिळाल्या होत्या. आता एका बॅग मध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असून पोलिसांना दुरशेत सरपंच यांच्या कडून सदर घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरची बॅग उघडून बघितली असता मृतदेह हा 30 ते 35 वर्षीय महिलेचा असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु या महिला मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे आणि पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत हे करीत आहेत.

सदरचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून पुढील कारवाई करिता पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

काही वर्षापूर्वी पेणच्या गागोदे खिंडीत शीना बोरा हत्याकांड प्रकरण उघडकीस आला होता, दुरशेत फाट्यावरील सदर घटना सुद्धा शीना बोरा 2 प्रकरण असल्याचे उपस्थित नागरिकांकडून बोलले जात आहे.