रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड तालुक्यातील वाळण जंगल भागामध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे… राहुल शिवाजी लाड असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून, राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने सर्वत्र खळबळ सुरू झाली आहे…. राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे…. वाळण खुर्द पोलीस पाटील दीपक भिकाराम महामुनी यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे…. राहुल याचा मृतदेह जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाला किंवा शिकारीला गेले असता राहुलला शिकारी गोळी लागली आहे का? अशी उलट सुलट चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे…. राहुल याचा मृतदेह टेम्पो मधून महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता डॉक्टरांनी सदरचा मृतदेह मुंबई येथील जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदना करिता पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच राहुलचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळणार असल्याचे समजते….
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. के. मुंडे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत….