अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह विविध कृषी विभागातील शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक केलं जाणार आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी तयार करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे.पी एम किसान योजनेचे पुढील हप्ते वेळेवर मिळतील.पीक विमा योजना व इतर अनुदान योजनांचा लाभ घेता येईल.शेतीसंबंधित विविध शासकीय योजनांसाठी त्वरित पात्रता मिळेल. शासनाच्या शेतीविषयक कर्ज व अनुदानित योजना सहज उपलब्ध होतील…
ऑॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपली नोंदणी करता येईल. या प्रक्रियेसाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मदत करत आहेत व कृषी सहायक यांच्या मार्फत गाव पातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे.पी एम किसान योजनेच्या अलिबाग तालुक्यातील २० हजार ५७८ लाभार्थ्यांपैकी फक्त ३ हजार ९४२ शेतकऱ्यांनीच आतापर्यंत फार्मर आयडी तयार केला आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने नोंदणी करावी, जेणेकरून शासनाच्या इतर योजनांचा सुद्धा शेतकऱ्यांना लाभ त्वरित घेता येईल.