रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
सर्वत्र होळीसणाची मस्ती असतानाच माथेरानमध्ये होळी आणि धुलिवंदनाची धूम पहावयास मिळाली.विकेंडला जोडून आलेल्या धुलिवंदनाच्या सणामुळे थोड्याफार प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते.त्यामध्ये येथील हॉटेलमध्ये रेन डान्सचे आयोजन केले होते.निसर्गाच्या सानिध्यात रंग उधळताना पर्यटक मंत्रमुग्ध होताना दिसले.शुक्रवार दि.14 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी येथील प्रीती हॉटेलमध्ये रेन डान्सचे आयोजन केले होते.सुरुवातीला केक कापून या सणाची सुरुवात झाली.पर्यावरण पूरक रंग आणि अंगावर पडणारा कृत्रिम पाऊस त्यातच गाण्यांच्या तालावर थिरकताना पर्यटकांना एक वेगळी मजा अनुभवता आली…सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पर्यटक रंगात न्हाऊन निघाले.गर्मीने हैराण झालेल्या पर्यटकांना येथील नैसर्गिक वातावरणाने सुखद आनंद दिला.
पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जात असून त्यापैकी रेन डान्स ही संकल्पना माथेरान मध्ये रुजू झाली आहे.हा रंगांचा सण आणि रेनडान्स यांची सांगड घालून गाण्यांच्या तालावर दिलखूष आनंद देण्यासाठी दोन दिवस अगोदर पासून याची तयारी सुरू केल्याचे हॉटेल मॅनेजमेंट कडून सांगण्यात आले यामध्ये पर्यटकाला कोणत्या गोष्टी प्राधान्याने दिल्या पाहिजेत यावर भर दिला गेला.त्यामुळे येथे आलेला पर्यटक सुखावून गेला.फक्त हॉटेल मध्ये राहिलेले पर्यटकांचं माहीत तर हॉटेल बाहेरील पर्यटक सुद्धा यामध्ये सामील झालेले दिसले.रंग उधळण्यासाठी माथेरान हे युनिक स्थळ आहे.इथे मनमुराद मौजमजा करावयास मिळते म्हणून आम्ही माथेरान हे डेस्टिनेशन निवडले असे येथे आलेल्या पर्यटकांकडून सांगण्यात आले.
पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी त्यांना मनसोक्त मजा करण्यासाठी आम्ही रेनडान्सचे आयोजन केले.यासाठी मागील दोन ते तीन दिवस तयारी करण्यात लागले.येथे आलेला पर्यटक सुखावून गेला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन धुलीवंदन की धूम ही थीम आयोजित केली होती.पाण्याचा केलेला साठा त्यातीलच पाणी रिसायकल करून रेनडान्ससाठी वापरले.पर्यटक येथून समाधान घेऊन गेला याचे समाधान आहे.