दापोली -मंडणगड-खेड येथील आमदार यांची घोडदौड… गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यशैलीचा वाढता प्रभाव…

0
54

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-  

दापोली तालुक्यातील मौजे बोंडीवली, थोरला-कोंड आणि सुतारवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीकडे पाहून आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या विचारधारेला विश्वास ठेवून शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला… महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय ना‌. योगेशदादा कदम  साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला…

यावेळी दापोलीचे मा. नगराध्यक्ष किशोरभाई देसाईं, प्रकाशही कालेकर आदी प्रमुख शिवसेना तालुका पदाधिकारी तसेच बोंडीवली, थोरला-कोंड आणि सुतारवाडी‌ येथील ग्रामस्थ बंधु-भगिनी, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक यांची लक्षणीय उपस्थिती होती… ना. योगेशदादा कदम यांच्या लोकाभिमुख कारभाराने दिवसागणिक कोंकणातील शिवसेना शिंदे गटाची भक्कम तटबंदी होताना दिसत आहे एवढे नक्की…