हेल्प फाऊंडेशन म्हणजे जखमी मनुष्य, पशु पक्षी यांचा आधार- उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम…

0
47

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

हेल्प फाऊंडेशन म्हणजे मनुष्य जीवनातील दुसरा परमेश्वर, मदतीला तत्काळ धावून जीवदान देणे म्हणजेच हेल्प फाऊंडेशन मनुष्य, पशु पक्षी यांचा आधार,असे प्रशंसनीय उदगार उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी काढले. खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खालापूर पोलीस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती खालापूर पोलीस ठाण्यात आयोजित केली होती…यावेळी दैनंदिनी जीवनात पशु,पक्षी व मनुष्य यांचे अपघात होतात, त्यांना वेळेवर उपचार करणे,विषारी,बिनविषारी साप घर,दुकान,परिसरातील आवारात येतात…त्यांना सुरक्षित पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देणे, रस्त्यावरील अपघातात जखमी जनावरे यांना होणारी इजा यावर तत्काळ उपचार हेल्प फाऊंडेशन यांच्या मदतीने होते, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीचे औचित्य साधून हेल्फ फाऊंडेशन यांचा सत्कार उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते व शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, हेल्पचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांच्या उपस्थितीत गुरुनाथ साठेलकर,भक्ती साठेलकर, ⁠पुजा चांदुरकर, ⁠विजय भोसले,⁠अमोल कदम, ⁠राजेश पारठे, ⁠हनिफ कर्जिकर, ⁠धनंजय गिध,⁠अमीत गुजरे, ⁠जयेश ठक्कर,प्रविण शेंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.शिवानी जंगम, उप नगराध्यक्ष संतोष जंगम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सदस्य,ग्रामस्थ,पोलीस कर्मचारी, सपोनि. संतोष औटी, उप पोलीस निरीक्षक विशाल पवार उपस्थित होते.