रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
धाटाव एमआयडीसीतील कायम धोकादायक असलेल्या ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीच्या भंगार गोदामाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली…प्रखर उष्णतेत आग लागल्याने कामगार यांसह रहदारी करणारे नागरिक,शेजारील गावातील ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले…आगीत भंगार मालाने पेट घेतला,काळे धुराचे लोट प्रचंड उंच दिसल्याने आगीचे रौद्ररूप असल्याची चर्चा सुरू झाली…अखेर मिळालेल्या माहितीनुसार धोकादायक प्लांटच्या शेजारील हा टाकावू रसायन भंगारचा गोदाम असल्याची माहिती समोर आली. भंगार आगीत कंपनीची मोठी नुकसान टळली तरीही कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आग लागताच कामगारांनी सतर्कता पाळल्याने मोठा अनर्थ टाळल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, अपघातात मेरिटमध्ये आलेल्या ट्रान्सवर्ड कंपनीत अपघाताच्या वारंवार घटना घडत आहेत…मागील वर्षभरातील अपघातात दोन कामगारांना जीव गमवावा लागला…त्यामुळे आगीचे वृत्त कळताच अनेकांनी धसका घेतला तर भंगार गोदाम भीषण आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचे अधोरेखीत झाले आहे…
धाटाव एमआयडीसीत डेंजर झोन म्हणून ओळख होत असलेल्या भयानक प्लांट दृश्यातील ट्रान्सवर्ड कंपनीत अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. कंपनीत वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे कारखाना निरीक्षक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप असलेल्या ट्रान्सवर्ड कंपनीत मंगळवारी दुपारी भंगार गोदामाला भीषण आग लागली. आग स्पार्किंगने लागल्याचे प्राथमिक सांगण्यात आले. आग लागल्याचे समजतात कामगारांचा परिवार व नागरिकांत काळजीचे वातावरण तयार झाले. प्रचंड धुराचे लोट दिसल्याने अपघाताची भीषणता मोठी असावी असा तर्क लावण्यात आला. मात्र टाकाऊ प्लास्टिक व अन्य रसायन गोदामाला आग लागल्याचे कंपनी प्रशासनाने स्पष्ट केले. कोणतीच दुर्घटना घडली नाही, या वृत्ताने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आग तातडीने आटोक्यात आणण्यात यश मिळविले. भंगार गोदामाला लागलेल्या आगीत नेमके काय होते, कंपनीची किती नुकसान झाले, हे अद्याप अधिकृत समोर आलेले नाही. मात्र आग व त्यातील उंच काळ्या धुराने सर्वांचीच धाकधूक वाढली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे हे एमआयडीसीच्या शेजारीच किल्ला येथील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पणासाठी आले होते. नेमकी त्याचवेळी आगेची दुर्घटना घडल्याने आता कंपनीच्या आग दुर्घटनेची चौकशी, त्यानंतर कारवाईचे आदेश स्थानिक प्रशासनाला मिळतात का ? अशी चर्चा सुरू झाली तर ट्रान्सवर्ड दिवसेंदिवस डेंजर झोनकडे जात आहे. वारंवार घडणाऱ्या भीषण दुर्घटनेतून कंपनी प्रशासन आता तरी बोध घेतो का, कारखाना निरीक्षक प्रशासन नेमकी काय कारवाई करतो ? हे लवकरच समोर येणार आहे.