काशिद येथे डिसिबी गु्रप आयोजीत सोयरे चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रथम विजेता पारगाव-पनवेल…

0
9
अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 
            मुरूड तालुक्यातील काशिद येथे डिसिबी ग्रुप आयोजीत सोयरे चषक स्पर्धा दिमाखदार व रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने संपन्न झाली…या स्पर्धेत सिध्देश वॉटर सप्लायर्स पारगाव-पनवेल या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर एस.जे.टायगर अलिबाग या संघाने द्वितीय,तर संस्कार स्पोर्टस् सर्वे संघाने तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेली बैल जोडी प्रथम क्रमांकाचे सिध्देश वॉटर सप्लायर्स पारगाव-पनवेल या संघाचे मालक विकी खोपकर यांना प्रदान करण्यात आली…

       या स्पर्धेचा शुभारंभ 13 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजता मुरूड पोलिस ठाणे प्रभारी नामदेव बंडगर यांच्या उपस्थित मान्यवराचे  हस्ते मैदानात श्रीफळ वाढवून करण्यात आला. स्पर्धेत एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता, गाव टू गाव प्रत्येक संघात दोन आयकॉन खेळाडूचा समावेश होता. स्पर्धेत आयकॉन खेळाडू केतन म्हात्रे, बॅटी बड्रीके,पंकज जाधव,दर्शन बांदेकर, सुमित डोंगरे, आकाश तारेकर, परेश ठाकूर, प्रसन्ना पाटील, मयुर वाघमारे, दिलिप म्हात्रे, अक्षय पवार, आकाश तवसाळकर वाशिक शेख आदी महाराष्ट्रातील नामचीन टेनिस क्रिकेटपटूनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा संघमालकास बैलजोडीचे आगळेवेगळे पारितोषीकासह प्रथम क्रमांकास रूपये 1 लाख व भव्य चषक आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते प्रथम क्रमांकाचे विजेते सिध्देश वॉटर सप्लायर्स पारगाव-पनवेल संघ व संघमालक विकी खोपकर यांना प्रदान करण्यात आले.तसेच व्दितीय क्रमांकास रूपये 50 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 25 हजार व भव्य चषक इतर मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. यावेळी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रितेश पाटील पारगाव-पनवेल, उत्कृष्ट गोलदांज सोहम खोपकर, सर्वे-मुरूड,उत्कृष्ट फलदांज मृणाल वरसोलकर अलिबाग, तसेच मालिकावीर म्हणून सुमित डोंगडे यांची निवड करण्यात आले त्याना मान्यवरांचे हस्ते चषक प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून मुंबईतील हेमंत मेस्त्री, ओमकार कंरजेकर, व नितेश दलाल हे काम पाहणारआहेत तर स्कोअरर म्हणून रावे येथील निकेत पाटील तसेच समालोचन व सुत्रसंचलन यासिन मर्चंट-थळ, रोशन पाटील-तारा पनवेल, डिजे ऑपरेटर म्हात्रे सांउड-डिजे निखिल, तसेच स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण पनवेल कार्ले येथील विवेक, अनुज, निशांत, अमोल यांनी केले.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, सरपंच संतोष राणे, परवेश बेलोसे, प्रतिक बेलोसे, विनोद घोसाळकर, प्रविण घोले, मंगेश कोंबळी, संदिप कासार, आतिष कासार, राकेश कासार, ओमकार कासार आदीने विशेष परिश्रम घेतले.  या स्पर्धेत पारितोषीक वितरण कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी व अलिबाग नगरपालिका नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह शिवसेना जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे,जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ,  भाजप सरचिटणीस अँड महेश मोहिते, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, अलिबाग तालुका  प्रमुख अनंत गोंधळी, रोहा तालुका प्रमुख अँड मनोजकुमार हिंगे, रा.काँ. अलिबाग व मुरूड विधानसभा संघटक अमित नाईक, संपर्क प्रमुख चंद्रकांत मोहिते, बोर्ली सरपंच सपना जायपाटील, तळेखार सरपंच विजय घाणेकर, गैरिनाथ कटोर, शैलेश काटे, अमोल लाड, विकी वेगस, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे व काशिद ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे यांनी केले…