आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा प्रथम क्रमांक… रोह्यातील वरवडे गावचे सुपुत्र प्रशांत मोहिते यांची उत्तम कामगिरी…

0
22

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):- 

आशियाई मिक्स बॉक्सिंग सर्धेत नेपाळ येथे प्रशांत मोहिते यांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिले..दि.३०मे ते ३१मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका,काठमांडू,नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्याचे रोहा तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी,आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पांडुरंग मोहिते यांनी आपले मार्गदर्शन देऊन खेळाडूंना प्रोसाहित करून भारतीय संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला…या स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांग्लादेश, भूतान, चीन, इराण, श्रीलंका, अफगाणिस्तान,थायलंड, इराक व इतरही देशांतील साधारण ६५० च्या आसपास खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बुढानीलकंठ महानगरपालिका व काठमांडू राष्ट्रीय खेलकुद परिषद नेपाळ सरकार यांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन केले होते…या स्पर्धेसाठी मुख्य पाहुणे श्री.राकेश मस्कर सर(ग्रँड मास्टर)(सचिव – वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग फेडरेशन) श्री.एम.एस.नाथा कुमार सर अध्यक्ष – आशियाई मिक्स बॉक्सिंग फेडरेशन तथा राष्ट्रीय अध्यक्ष – श्रीलंका मिक्स बॉक्सिंग असो. श्री.सुमन लामा सर अध्यक्ष – आशियाई मिक्स बॉक्सिंग फेडरेशन तथा राष्ट्रीय अध्यक्ष – नेपाळ मिक्स बॉक्सिंग असो. यांच्या उपस्थित पार पडली… आदितीताई तटकरे (खासदार) तथा भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघाचे नेतृत्व श्री.प्रशांत मोहिते सर (राष्ट्रीय खजिनदार – भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघ) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला सुवर्णपदक २५, रौप्यपदक १५,कांस्यपदक १३ अशी मिळून ६३पदके पटकावली. यामध्ये त्यांच्या आई वडील व प्तनी चा मोलाचा वाटा आहे