अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाड तालुका महिला अध्यक्षपदी शबा परवीन वारोसे यांची निवड…. 

0
12

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाड तालुका महिला अध्यक्षपदी बिरवाडी येथील शबा परवीन वारोसे यांची निवड करण्यात आली आहे ….अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक दि.17/06/2025 संपन्न झाली… यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी शबा परवीन वारोसे यांची महाड तालुका महिला अध्यक्ष म्हणून निवड करुन त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले…
महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे… त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे… पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याबाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाहीचा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे… सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, आंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी यावेळी दिली…
शबा परवीन वारोसे यांची या समितीच्या तालुका महिला अध्यक्ष म्हणून झालेल्या  निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे…