द्रोणागिरी स्पोर्ट्स महोत्सवाचा भव्य शुभारंभ… २५ वा रौप्य स्पोर्ट्स महोत्सव जल्लोषात सुरू…

0
9

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-   

उरण तालुक्यातील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित २५ व्या रौप्य स्पोर्ट्स महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जेनपेटी टाऊनशिप स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडला.आजच्या पहिल्या दिवशी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय महादेव घरत यांच्या हस्ते करण्यात आले.महोत्सवाच्या निमित्ताने सलग तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकर्ते आणि महादेव घरत यांनी उपस्थितांशी संवाद साधत क्रीडाप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन केले.