नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे ते दि.बा.पाटील हे नेमके कोण होते?नवी मुंबईतील स्थानिकांसाठी ते इतके महत्त्वाचे का आहेत?यावर एक दृष्टिक्षेप.तर मंडळी ही गोष्ट आहे ७० च्या दशकातील… मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा भर कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई हे शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी स्थापना केली सिडकोची …आणि याच नवी मुंबईसाठी १५ हजार रुपये एकरी भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या…परंतु शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना ४० हजार एकर भाव मिळावा आणि सोबत त्यांना १२.५% विकसित भूखंड मिळावा अशी मागणी दि.बा. पाटील यांनी केली…सरकारच्या या मनमानी विरोधात आंदोलन उभारण्यासाठी पनवेल-उरण परिसरातील ५० हजार शेतकरी जासई या गावात जमा झाले होते… आणि या आंदोलनाचं नेतृत्व केलं दि. बा. पाटील यांनी… दि. बा. पाटीलांच्या या आंदोलांसमोर सरकारलाही नमतं घ्यावं लागलं…आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या… आज नवी मुंबई परिसरातील आगरी समाज हा स्वतःच्या जमिनी जाऊनही स्वतःच्या भूमीवर राहताना दिसतोय… तो दि. बा. पाटील यांच्यामुळे … जासईच्या ज्या आंदोलनामुळे दिबा पाटीलांना प्रकल्पग्रस्तांचा नेता बनवलं…त्याच जासई गावातील दि बांच्या संग्राम या छोट्याशा घरात आजही बलिदान दिलेल्या ५ शेतकऱ्यांचे फोटो जशेच्या तसे लावलेले आहेत…५ वेळा आमदार, दोन वेळा खासदार,विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दि. बांची राजकीय कारकीर्द राहिली आहे … दि. बानी स्वातंत्र्य संग्रामातही आपलं योगदान दिल आहे… तरुण असताना ते १९४२ च्या चळवळीत सहभागी झाले होते…संयुक्त महाराष्ट्र चळवळ,बेळगाव सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला…तुरुंगवासही भोगला… त्यामुळे भूमिपुत्रांच्या पायाखालची जमीन आजही शाबूत ठेवणाऱ्या नेत्याच्या प्रेमापोटीच नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होत आहे…