रोडपाली–कळंबोली परिसरात तृतीयपंथीयांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात प्रदीप ठाकूर आक्रमक

0
1

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

सायन–पनवेल महामार्गावरील कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाका या दरम्यान उड्डाणपुलाखाली रात्री काही तृतीयपंथीयांकडून अश्लील हावभाव करणे, तरुण मुलांना बोलावून चुकीच्या मार्गावर ओढण्याचा प्रयत्न करणे आणि महिलांना त्रास देणे, जबरदस्ती करून पैसे घेणे — या सर्व प्रकारांमुळे रोडपाली–कळंबोली परिसरातील वातावरण अस्वस्थ आणि असुरक्षित बनले आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं असताना या गंभीर प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.

प्रदीप ठाकूर यांनी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये रीतसर निवेदन दाखल करून स्पष्ट मागणी केली आहे की, तृतीयपंथीयांकडून होणारे हे अश्लील प्रकार आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या हालचालींवर तातडीने आळा बसला पाहिजे.
ठाकूर म्हणाले, हा प्रश्न माझा नाही… हा माझ्या रोडपाली–कळंबोली कुटुंबातील प्रत्येक नागरिकाचा आहे. मला येथील सर्वजण भाऊ मानतात, आणि त्यांना होणारा होणारा हा त्रास मी कधीही सहन करू शकत नाही.

ते पुढे म्हणाले, तरुण मुलांना जाळ्यात ओढणे, महिलांना अडवणे, अश्लील वर्तन करणे — हे प्रकार आता पुरे झाले आहेत. जर हे लगेच थांबले नाही, तर मी स्वतः आणखी आक्रमक होईल. आम्ही शिवसैनिक पद्धतीने उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही. निवेदन स्वीकारल्यानंतर कळंबोली पोलिसांनी संबंधित ठिकाणी पेट्रोलिंग वाढवून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

नागरिकांनी दीर्घकाळ सहन केलेला हा त्रास आता संपणार का, हा सर्वांचा प्रश्न असला तरी प्रदीप ठाकूर यांनी पुढाकार घेतल्याने परिसरात एक सुरक्षा भावना निर्माण झाली आहे. या विषयावरील त्यांच्या कठोर भूमिकेमुळे प्रशासनही या समस्येकडे गंभीरतेने पाहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.