पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.यामध्ये भाजपचे 3 उमेदवार तर राष्ट्रवादी पक्षाचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. 11 अ मालती तुकाराम म्हात्रें (भाजप), प्रभाग क्रमांक 11 (ब)स्मिता दयान पेणकर (भाजप), प्रभाग क्रमांक 12 अभिराज रमेश कडू(भाजप) तर प्रभाग क्रमांक 12 सुशीला हरिच्छंद्र ठाकूर (राष्ट्रवादी अजित पवार),प्रभाग क्रमांक 9 वसुधा तुकाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार), प्रभाग क्रमांक 5 दीपक जयवंत गुरव(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ) हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, या निकालाने महायुतीचे पारडे जड झाले आहे. विजयी उमेदवारांचे आमदार रवींद्र पाटील यांनी अभिनंदन केलेय.

