रोहा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांत जोरदार राडा… राष्ट्रवादीचे समीर सकपाळ व भाजपचे रोशन चाफेकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची…

0
2

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडच्या रोहा नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान क्षुल्लक कारणावरून राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर सकपाळ,तर भाजपचे अधिकृत उमेदवार रोशन चाफेकर यांच्यात प्रथमतः शाब्दिक बाचाबाची झाली.त्यांनतर समीर सकपाळ यांचे चिरंजीव हे या वादात सहभागी झाले त्यानंतर  रोशन चाफेकर व सकपाळ यांचे चिरंजीव शिवराज सकपाळ यांच्यात धक्काबुकी झाली.
त्यामुळे मेहेंदळे हायस्कुल परिसरात  काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदारांमध्ये देखील यावेळी भीतीचे वातावरण दिसून आले.यावेळी रोहा DYSP प्रसाद गोकुळे यांनी घटनास्थळी वाद शमविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे व भाजप चे युवा नेते अमित घाग हे देखील घटनास्थळी दाखल झाले.यावेळी  मेहेंदळे हायस्कुल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला..