श्री माघी गणेश जंयती उत्सवात गणेश भक्तांची एकच मांदियाळी…

0
9

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

गुरुवारी माघ शु.३ शके १९४६ अर्थात श्री माघी गणेश जयंती उत्सव संपूर्ण महाड तालुक्यात या उत्सवाची एकच धुम पहावयास मिळाली सर्वत्र गणेश भक्तांची मांदियाळी आणि पहाटे पासून दिवसभर भक्तिमय वातावरण त्याच सोबत महिलांचे हळदी कुंकू पूजा अर्चा महाप्रसाद आदीच आयोजन पहावयास मिळाल तालुक्यांतील वरंधा घाटाच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र माझेरी या कड्याकपारीतील गावांत पहाटे ५ वाजले पासून भुपाळी काकड आरती अनेक प्रसिध्द ह.भ.प. यांच्या करवी तर मंगल कलश पुजन ध्वजरोहन भजन किर्तन श्रीचा महा प्रसाद हळदी कुंकु हरिपाठ हरिजाग श्रीची सवाद्य मिरवणुक असे अनेक धार्मिक कार्य क्रमांच आयोजन करण्यात आल शहरांतील श्री गणेश मंदिर काकरतळे जुना पोष्ट नाका पिंपरपार श्री विरेश्वर मंदिर बसस्टॉप दस्तुरी नाका आदी ठिकाणी त्यासह संपूर्ण तालुक्यात लाडक्या गणपती बाप्पाच्या अर्थात श्री माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्सवात आणि तेवढ्याच भक्ती भावात आयोजन करण्यात आल…