घोसाळे जिल्हा परिषदेत सर्वसामान्य उमेदवाराला जनतेचा कौल; शिवसेनेच्या उर्वशी वाडकर यांना भक्कम पाठिंबा… घरोघरी प्रचाराचा झंजावात; घोसाळेत उर्वशी वाडकरांच्या उमेदवारीला एकमुखी समर्थन…

0
4

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना पक्षाने सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील उमेदवार म्हणून उर्वशी वाडकर यांना उमेदवारी दिली आहे. एका सामान्य घरातून उमेदवार दिल्यामुळे मतदारसंघात समाधानाचे वातावरण असून गावागावातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. उर्वशी वाडकर यांचे पती उद्देश वाडकर हे अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय आहेत. गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. गावातील कोणतीही समस्या असो, ती तात्काळ सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे म्हणून उद्देश वाडकर यांचा जनतेमध्ये मोठा विश्वास आहे.

दरम्यान, या मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या विकासकामांमुळेही शिवसेनेच्या बाजूने वातावरण तयार झाले आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांना आमदार दळवी यांनी मंजुरी दिली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा आमदारांवर ठाम विश्वास आहे. सध्या उर्वशी वाडकर यांच्या प्रचाराचा झंजावात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष संपर्क साधत प्रचार केला जात असून या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घराघरातून मिळणारा पाठिंबा आणि लोकांचा वाढता उत्साह पाहता संपूर्ण गावातील नागरिकांनी या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा दिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आणि विकासकामांचा ठोस पाया यामुळे घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघात जनता पुन्हा एकदा शिवसेना पक्षालाच कौल देणार, असे ठाम चित्र सध्या निर्माण झाले आहे…