महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
बिर्ला ओपस पेंट्स, महाड यांनी आज जागतिक ख्यातीचे आध्यात्मिक गुरु, मानवतावादी कार्यकर्ते आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आगमनाचे स्वागत करत अभिमान व्यक्त केला.या विशेष भेटीदरम्यान महाड MIDC मधील गोदरेज अॅस्टेक, हायकल, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स आणि इतर उद्योगांच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.
गुरुदेवांनी बिर्ला ओपस पेंट्स महाड युनिटचे मनापासून कौतुक करताना प्रकल्पाची सुबक रचना, पर्यावरणपूरक परिसर आणि ‘दुनिया को रंग दो’ या ब्रँड टॅगलाइनचे सार प्रतिबिंबित करणारी रंगसंकल्पना विशेषत्वाने आवडल्याचे सांगितले.उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कार्यस्थळी आनंद, सजगता, एकोप्याचे भोजन आणि ध्यान यांसारख्या संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवन अधिक समृद्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
गुरुदेवांच्या शिकवणीने व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने उपस्थित उद्योगजगत व बिर्ला ओपस परिवारामध्ये सकारात्मक ऊर्जा व प्रेरणेची नवी स्फूर्ती निर्माण केली.बिर्ला ओपस पेंट्स टीमने गुरुदेवांचे आभार मानत सांगितले की, ही भेट उद्योगाच्या सर्वांगीण व मूल्याधिष्ठित विकासासाठी मार्गदर्शक ठरेल.

