जनतेचा विश्वास मधुशेट पाटील यांच्यावर; भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात विकासाला पसंती…

0
1

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

भुवनेश्वर जिल्हा परिषद गट क्रमांक 41 मधील निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, येत्या ५ तारखेला होणाऱ्या मतदानात जनता ठामपणे मधुकर उर्फ मधुशेट पाटील यांनाच मतदान करणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मधुशेट पाटील यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, गावोगाव आणि वाडी-वस्त्यांमध्ये त्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे.

1990 पासून या भागात सातत्याने सामाजिक आणि विकासकामे करणारे मधुशेट पाटील हे केवळ निवडणुकीपुरते सक्रिय नसून, कायम जनतेच्या सोबत उभे राहिलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अनेकांनी केवळ टीका, आरोप आणि राजकारण करण्यात वेळ घालवला, मात्र मधुशेट पाटील यांनी अशा टीकेकडे दुर्लक्ष करत विकासालाच सर्वोच्च प्राधान्य दिले.

रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, मूलभूत सुविधा, अंतर्गत रस्ते, ग्रामविकासाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहेत. या कामांचा प्रत्यक्ष लाभ आज सामान्य नागरिकांना मिळत असून, त्यामुळेच लोकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

स्थानिक समस्या, नागरिकांच्या गरजा आणि परिसराच्या विकासाची अचूक जाण असलेले नेतृत्व म्हणून मधुशेट पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मतदारांशी त्यांचे नाते केवळ राजकीय नसून आपुलकीचे आणि विश्वासाचे आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे.

एकूणच भुवनेश्वर जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक विकास, अनुभव आणि जनतेच्या विश्वासावर लढली जात असून, येत्या ५ तारखेला जनता मधुशेट पाटील यांनाच कौल देणार असल्याचे वातावरण संपूर्ण परिसरात तयार झाले आहे.