७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित आंबेत सावित्री विद्यालयात देशभक्तीपर कार्यक्रम…

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

२६ जानेवारी २६ रोजी देशात ७७ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमीत्त ग्रुप ग्रामपंचायत आंबेत हद्दीतील ग्राम पंचायत कार्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळा,डाक कार्यालय गाव तलाव,पोलिस चेक पोस्ट ,आंबेत phc तदनंतर आंबेत स्टेट बँक सावित्री विद्यालय अश्या विविध ठिकाणी ध्वजवंदन कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमा निमित्त विद्यालयाला भेट वस्तू देणाऱ्या दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांचे विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आले..

तसेच शिक्षक हनुमंत लुबाल , म्हात्रे मॅडम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला… तदनंतर शालेय क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले… त्यामध्ये एका ५ वर्षाच्या जिजाई सावंत या छोट्याश्या चिमुकलीने देखील लाठीकाठी सादर करत देशभक्ती वर असणारे प्रेम तिच्या सादरीकरणातून दिसून आले. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले…