ग्रामसखी व महिला समुहांसाठी आरोग्य शिबीर व रोजगार मेळावा संपन्न…

0
1

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

सर्व ग्रामसखी व स्वयंसहायता समुहातील महिलांसाठी आरोग्य विषयक विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांना गर्भाशय कॅन्सर विषयक तज्ञ मार्गदर्शन करण्यात आले तसेच गर्भाशय कॅन्सर तपासणी (चाचणी) मोफत/सुलभ दरात करण्यात आली.

महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय कॅन्सरच्या प्रमाणाबाबत जनजागृती होणे, वेळेत तपासणीचे महत्त्व समजावे या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांनी लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.

याच कार्यक्रमाअंतर्गत स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यामध्ये महिलांना विविध स्वयंरोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार संधींबाबत माहिती देण्यात आली. इच्छुक महिलांची नोंदणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच विश्वरूप प्रतिष्ठान मार्फत करण्यात येणाऱ्या शेवगा प्रकल्प संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

सदर उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली असून, आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंचायत समिती मा. गट विकास अधिकारी श्री. उदयसिंह साळुंखे, मा. तालुका अभियान व्यवस्थापक श्री. संचित पार्टे, RSETI डायरेक्टर श्री. सुमितकुमार धानोरकर सर, विश्वरूप प्रतिष्ठानच्या श्रीम. मिनल बुटाला, विस्तार अधिकारी ( आरोग्य ) श्रीम. चिनके मॅडम, डॉ. अभय वैद्य, आरोग्य विभागाचे श्री. निलेश मोरे सर, RSETI FACULTY, सर्व प्रभाग समन्वयक, सर्व प्रकारच्या ग्रामसखी, समुहातील महिला उपस्थित होते.