महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
मी एका राजकीय पक्षाचा लोकप्रतिनिधी व एका गावचा सात वर्षे सरपंच असतानाही शासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून माझ्यावर रायगड व त्नागिरी जिल्ह्यातून हद्दपारच्या कारवाईला आमदार गोगावल्यांचा हात असल्याचा आरोप महाड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केल्याने महाडमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे…
माझ्या हद्दपारी मागे आमदार भरत गोगावले यांचा हात असून त्यासाठी ते स्वतः प्रांताधिकारी कार्यालयात गेले व तातडीने निर्णय घेण्यात प्रांताधिकार्यांवर दबाव आणला…असे सांगून सोमनाथ ओझर्डे म्हणाले की माझ्या घरात वृद्ध आई-वडील,पत्नी व मुलं असताना त्यांना तीन महिने सोडून मला जावे लागणार आहे…असा कोणता गुन्हा मी केला आहे…असा सवाल करीत माझ्यावरील कारवाई ही राजकीय सुडापोटी केली असल्याचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सांगितले…मी कोणता गुन्हा केला की माझ्यावर हद्दपारी करण्याइतपत कारवाई करण्यात आली…रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दबावाखाली येऊन माझ्यावर कारवाई केली आहे…
माझ्यावर हद्दपारची कारवाई करण्यामागे आमदार गोगावले असून राजकीय दबावामुळे माझ्यावर कारवाई करत असले तरी येत्या निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातील जनताच गोगावलेना हद्दपार करणार आहे असे सांगत दोन महिन्यानंतर गोगावलेच हद्दपार होतील हा माझा तुम्हाला शाप असल्याचे सोमनाथ ओझर्डे यांनी सांगितले मला हद्दपार करून तुम्ही जिंकून येऊ शकत नाही मला हद्दपार करणे हा तुमचा भ्रम आहे…
माझ्यावर हद्दपारची कारवाई करून माझ्या हत्त्येचा कट रचण्याचे कारस्थान आमदार गोगावले करीत असून माझ्या हत्याच्या कटाला जबाबदार रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे ,जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे,महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह आमदार व त्यांचे पुत्र हे जबाबदार राहणार असल्याचा घणाघाती आरोप सोमनाथ ओझर्डे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे…