हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू…सागर गायकवाड असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव…

0
58

 महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

महाड तालुक्यातील महाड तालुका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन सागर गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. सागर गायकवाड हे पोलीस हवालदार या हुंद्द्यावर कार्यरत होते…तसेच आपली ड्युटी बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गायकवाड हे वॉरंट बनवण्याचे काम करीत होते अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रथम सागर गायकवाड यांना महाड येथील देशमुख यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या झटक्यामध्ये सागर गायकवाड यांचे निधन झाले असून गायकवाड यांनी यापूर्वी महाड शहर पोलीस ठाणे, म्हसळा पोलीस ठाणे, पोलादपूर पोलीस ठाणे,रायगड जिल्हा अधीक्षक कार्यालय, वाहतूक पोलीस महाड अशा अनेक ठिकाणी पोलीस खात्यामध्ये नोकरी केली होती. सागर गायकवाड यांच्या अचानक जाण्याने पोलीस प्रशासन विभागावर शोककळा पसरली आहे. गायकवाड यांच्या पाश्चात त्यांची पत्नी महिला पोलीस हवालदार नीलिमा गायकवाड व एक मुलगी, मुलगा असा त्यांचा परिवार आहे. सागर गायकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून रायगड जिल्हा पोलीस दलामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपले काम केले होते. गायकवाड यांचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाणे येथे सदरचा मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.