माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
मागील काही दिवसांपासून माणगावमध्ये अनेक मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत…विविध कारणांमुळे मुली बेपत्ता झाल्याचे लक्षात आले आहे. त्यात अनेक मुलींना पळवून नेल्याचे देखील अंदाज पोलिसांनी व्यक्त केले आहेत…अशाच काहीशा घटना ताज्या असताना माणगाव तालुक्यात पुन्हा एक विवाहिता बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे…मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक २२ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खरबाची आदिवासी वाडी येथे राहत असलेली रुचिता सुनील जाधव वय वर्ष २२ हिचा पती घरी झोपला असताना ती आपल्या स्वतःच्या घरातून कोणालाही न सांगता आपल्या राहत्या घरातून निघून गेली आहे… अद्याप घरी परतली नाही तिचा शोध घेतला असता ती मिळाली नसल्याने मंगल लहू जगताप वय वर्ष ३८ राहणार- कातेवाडी -आदिवासी वाडी, यांनी माणगाव पोलीस ठाण्यात मिसिंग अंतर्गत तक्रार दाखल केली आहे… मिसिंग असलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे असून नाव- रुचिता सुनील जाधव. वय.-वर्ष २२ रंग गोरा चेहरा उबट, पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सफेद रंगाचे लेडीज बूट, गळ्यात छोटे मंगळसूत्र आहे… कोणच्याही निदर्शनास आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन माणगाव पोलिसांनी केले आहे… या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बो-हाडे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तूणतुने, सह फौजदार निमकर, करीत आहेत…मिसिंगच्या बाबी गंभीर असून त्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी समस्त माणगावकर करीत आहे.