स्त्री शक्ती फाउंडेशनचा भारतीय जनता पक्षास जाहीर पाठिंबा; अपक्ष उमेदवार विजया कदम यांची अधिकृत घोषणा… 

0
2

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीतील कळंबोली प्रभाग क्रमांक ८ (क) येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विजया चंद्रकांत कदम यांनी भारतीय जनता पक्षास जाहीर पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्या आशयाचे पाठींबा पत्र त्यांनी आज (दि. ०६) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.

सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण तसेच स्थानिक नागरी विकास या क्षेत्रांत सातत्याने कार्य करत असताना, कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पनवेल व कळंबोली परिसरात राबवलेल्या विविध विकासकामांवर आपला ठाम विश्वास असल्याचे विजया कदम यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाविना, पूर्ण वैचारिक स्पष्टता आणि स्वेच्छेने, मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. हा पाठिंबा स्वाभिमान, जबाबदारी, पारदर्शकता आणि जनहित या मूल्यांवर आधारित असल्याचेही त्यांनी नमूद केले. पनवेल व कळंबोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन, सकारात्मक, विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्य करू, असे आवाहन विजया कदम यांनी करून पनवेल महापालिका निवडणुकीसाठी स्त्री शक्ती फाउंडेशनचा पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, तसेच भाजप युतीच्या उमेदवारांनी त्यांचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उमेदवार अमर पाटील, बबन मुकादम, रविंद्र भगत, राजेंद्रकुमार शर्मा, विजय खानावकर, बायजा बारगजे व इतर मान्यवर उपस्थित होते.