Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडदिग्गजांच्या उपस्थितीत महाडमध्ये भव्य शक्तिप्रदर्शन... भरतशेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

दिग्गजांच्या उपस्थितीत महाडमध्ये भव्य शक्तिप्रदर्शन… भरतशेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

 महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

महाड विधानसभेमध्ये गोगावले व जगताप कुटुंबियांमध्ये पुन्हा लढत होत असून यंदा स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप कामत या आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल 28 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप कामत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून भव्यशक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले. तर आज 29 ऑक्टोबर 2024 रोजी महाड विधानसभेचे विद्यमान आमदार शिवसेनेचे पक्ष प्रतोद उपनेते भरत शेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, रायगड लोकसभेचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे ,भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर,माजी आमदार प्रवीण दरेकर या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला…या सभेत संबोधित करताना महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल झालेल्या सभेमध्ये सुभाष देसाई यांनी केलेल्या टीकेला सडकून प्रतिउत्तर दिले. तुम्ही उद्योग मंत्री असताना तुमच्या मुलाने काय काय उद्योग केले हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका असा इशारा देखील या सभेतून उदय सामंत यांनी दिला. आमदार भरत शेठ गोगावले हे केवळ विजयाचा चौकार मारणार नाहीत तर एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आमदार भरत शेठ गोगावले  हे त्यांची इच्छा असेपर्यंत महाड विधानसभेचे आमदार राहतील असे भाकीत देखील यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातच  आमदार गोगावलेंना मंत्रिपद व पालकमंत्री पद दिले जाईल असा विश्वास व्यक्त केला…आमदार भरतशेठ  गोगावले यांनी शिवसैनिकांना  संबोधित करताना आपण मागील पंधरा वर्षात केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. जनतेच्या सुखा दुखात, जनतेच्या अडचणीच्या काळात  आम्ही वर्षाचे 365 दिवस सर्वांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देत असते. जमलेला जनसमुदाय हा ग्रामीण भागातील असून कोणी पैसे देऊन आणलेला नाही. त्यामुळे हेच माझ्या विजयाचे शिल्पकार ठरणार आहेत असा विश्वास व्यक्त केला. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी स्वतःचा आत्मपरीक्षण करावं, आपण किती पक्ष बदलले मग खरे गद्दार कोण असा टोला देखील यावेळी लगावला…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments