रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
उपअधीक्षक भूमि अभिलेख खालापूरचा पदभार बाळकृष्ण सोनवणे यांनी स्वीकारला आहे…. परीक्षण भूमापक क्र.६ नगर भूमापन अधिकारी चेंबूर (मुंबई) येथे कार्यरत असलेले श्री.बाळकृष्ण हरिश्चंद्र सोनवणे यांची नुकतीच निमतानदार क्र.२ उपअधीक्षक भूमि अभिलेख खालापुर येथील कार्यालयात नियुक्ती झाली… त्यानुसार बुधवार (दि.३०) रोजी त्यांनी कार्यभार स्वीकारला… यानंतर बाळकृष्ण सोनवणे यांची उप अधीक्षक भूमी अभिलेख खालापूर येथील मुख्यालय सहाय्यक श्री.उत्तम केंद्रे, युनायटेड जनाऀलिस्ट फोरमचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा खालापूर वार्ताचे संपादक श्री.सुधीर माने,महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे संचालक श्री.प्रमोद राईलकर,पत्रकार श्री.आनंद पवार,यश कम्प्युटरचे मालक श्री.संतोष गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या…