पेण शिवसत्ता टाइम्स ( प्रदिप मोकल ) : –
पेण सुधागड विधानसभा मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे प्रसाद भोईरच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत… शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग विधानसभेची उमेदवारी पक्षाने दिले असताना देखील केवळ घटक पक्षाचे सहकारी जयंत पाटील यांचा मान म्हणून पक्षप्रमुखांनी सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे आम्ही आघाडी धर्म पाळला आहे… तसाच आघाडी धर्म इतर घटक पक्षांनी पाळावा असे आवाहन शिवसेना उपनेते विजय कदम यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले…प्रसाद भोईर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा कदम यांनी यावेळी केला… प्रसाद भोईरच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून ते शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढत आहेत… त्यांना शिवसेना व घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे… तरी कोणीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करू नये… असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केले… या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते विजय कदम, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, उमेदवार प्रसाद भोईर, विधानसभा सहसमन्वयक समिर म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, संघटक लहू पाटील, तालुका सह संपर्कप्रमुख भगवान पाटील जिते विभाग प्रमुख राजू पाटील,यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचे पेण विधानसभेतील उमेदवार प्रसाद भोईर म्हणाले की… पेण शहरासह विधानसभा मतदारसंघाचा विकास प्राथमिकतेने करणार,.. पेण खारेपाटातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार… रोजगार, पाणी, रस्त्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही यावेळी प्रसाद भोईर यांनी दिली…