महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटच्या दिवसात चांढवे बु येथील माजी सरपंच डॉ. इरफान अंतूले यांनी शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
डॉ अंतूले यांचा आजचा पक्ष प्रवेश म्हणजे आमदाराना जोरदार धक्का दिला असून स्नेहल जगताप यांचा विजय निश्चित आहे.आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेला प्रवेश आमदाराना घाम फोडणारा आहे असे स्नेहल जगताप म्हणाल्या. या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहल दिदी बोलत होत्या.यावेळी जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, उप तालुका प्रमुख चैतन्य म्हामुणकर, इम्रानभाई अंतुले, विभाग प्रमुख इम्रान कौचाली, विभाग संघटक अविनाश चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक आश्रफभाई कापडी, युवासेना प्रमुख प्रफुल धोंडगे, महेंद्रशेठ धोंडगे, सरपंच अशोक करंबळेकर आणि सर्व मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी चांढवे गावातील खालील प्रमुखांनी पक्ष प्रवेश केला.
डॉ.इरफान अब्बास अंतुले(माजी सरपंच ) रुबीना अंतूले (माजी सरपंच ) हिदायतुल्ला कादिर अंतुले,लतीफ कादिर अंतुले,बरकत अली मांडिलकर,अब्दुल गनी शेख अली कौचाली, बशीर महमूद अंतुले,हमीद अब्बास अंतुले, बशीर हाजी जुळे, इर्शाद हाजी जुळे, अब्दुल करीम शेख अली अंतुले,रफिक उस्मान गजगे,वाजिद युसूफ कौचाली,नदीम सुलेमान अंतुले,फरझाना अब्बास अंतुले,अब्बास उस्मान पानसारी,फैजुल्ला फजल अंतुले,अझीम कादिर पानसारी, गोडमे,खलील अब्दुल्ला अंतुले,इर्शाद इब्राहिम अंतुले, प्रकाश शेडगे.