पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
अमित शाह यांनी भाजपच्या भरसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले…याचा तीव्र पडसाद देशात आणि राज्यात होताना दिसत आहेत. .याच पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शाहांचा तीव्र निषेध केला आहे. संतप्त जमावाने पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोेलन केले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देशाच्या एका बड्या नेत्याने केलेलं वक्तव्य़ हे देशासाठी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे सर्व नेते एकत्र येत यावर निषेध व्यक्त करत आहोत असं मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमीत शाह यांना सांगू इच्छितो की, यापुढे पुन्हा असे काही वक्तव्य़ केले तरआम्ही तुम्हाला सत्तेतून हटवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे… या आंदोलनाला माजी आमदार बाळाराम पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत,पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील,पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू,शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी,काँग्रेस नेते प्रवीण कांबळे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते