संविधान के सम्मान में गोरेगांवकर मैदान में… गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध गोरेगावमध्येही…

0
41

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

परभणीमधील संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी गोरेगावातील नागरिकांनी शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, लिंक रोड, गोरेगाव पश्चिम येथे निषेध व्यक्त केला…तसेच बांगुर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना गोरेगावकरांच्यावतीने या घटनेचा निषेध करणारे व सदर प्रकरणातील दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी गोरेगावातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे प्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…विशेष म्हणजे या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, वंचित, बसपा, सपा, RPI, आझाद समाज, कम्युनिस्ट आणि पुरोगामी आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते…