बिनशेती परवानगी रद्द करा…रुपाली देवरूखकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

0
68

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 

मिळकतीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसताना बिनशेती करण्यात आलेल्या मिळकतीचा बिनशेती परवाना रद्द करण्यात यावा,अशी मागणी रुपाली देवरुखकर यांच्यातर्फे मुखत्यारपत्रधारक संदीप वाघपंजे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे…बिनशेती परवानगी रद्द करण्याबरोबरच मिळकतीमध्ये केलेले  बांधकाम बेकायदेशीर असल्याचे घोषित करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणीदेखील संदीप वाघपंजे यांनी केली आहे…अलिबाग रेवस रस्त्यावरील बोरिस ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ६५/१ मध्ये रुपाली देवरुखकर यांची सुमारे साडेपाच गुंठे मिळकत आहे…या मिळकतीच्या मागच्या बाजूला गुंजीस येथील गट क्रमांक १४/ १ ही सुषमा अगरवाल यांच्या नावे  मिळकत आहे…सुषमा अगरवाल यांच्या मिळकतीमध्ये जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही…यामुळे त्यांनी रुपाली देवरुखकर यांच्या जागेतूनच रस्ता बनवून आपल्या मिळकतीला दरवाजा लावला आहे…सुषमा अगरवाल यांनी त्यांची मिळकत बिनशेती केली आहे… परंतु मिळकत बिनशेती करताना त्या मिळकतीमध्ये जाण्यासाठी रस्ता असणे अपेक्षित असते परंतु रस्ता नसतानाही प्रशासनाला अंधारात ठेवून सुषमा अगरवाल यांनी त्यांची मिळकत बिनशेती करून घेतली असल्याचे मुखत्यारपत्र धारक संदीप वाघपंजे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या निदर्शनात आणून दिले आहे…अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाट्यानजीक महिला शेतकऱ्याची गट क्रमांक ६५/१ या सातबाऱ्यावर ५.६० गुंठे जागा आहे…ही जागा अलिबाग रेवस रस्त्यालगत असल्याचे शेतकरी रुपाली देवरुखकर यांना माहित होते… परंतु त्यांच्या जागेच्या मागे असणाऱ्या जागा मालकाने त्यांच्या जागेत काँक्रीटची भिंत घातल्याने त्यांनी आपली जागा किती आणि कोणती आहे, हे जाणून घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे जागा मोजणीचा अर्ज दाखल केला… त्यानुसार भूमिअभिलेख कार्यालयाने त्या जागेची मोजणी केली…जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आधुनिक यंत्रणेद्वारे जमिनीची मोजणी सुरु केली,त्यावेळी महिला शेतकरी यांची जागा काँक्रीटच्या उभारलेल्या भिंतीपासून रस्त्याच्या बाजूला निघत असल्याचे मोजणीमध्ये दिसून आले…त्यानुसार मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जागेची सीमा चिन्हांकित केली…यामुळे शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे…आपली जमीन रस्त्यात निघाल्याने महिला शेतकरी हवालदिल झाल्या आहेत…ज्याठिकाणी जागा चिन्हांकित झाली आहे…ते ठिकण म्हणजे अलिबाग रेवस रस्ता आहे…जिल्हा भूमि अभिलेख विभागाच्या यंत्रणेने केलेली मोजणी सदोष आहे…भूमिअभिलेख विभागाने केलेली मोजणी गाव नकाशानुसार न करता धनदांडग्यांना फायदा होईल अशी केली आहे… धनदांडग्यांना वाचविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने मुख्य रस्त्याच्या बाजूला जागा असल्याचे चिन्हांकित करून देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माथ्यावर आपली चूक मारली असल्याचे संदीप वाघपंजे यांनी सांगितले…