रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्हयातील एसटी बस सेवा नागरिकांच्या जीवाशी कशी खेळत आहे याचे जिवंत उदाहरण मनसेकडून दाखवण्यात आले. पेण आगारातून मुरूड दिशेकडे जायला निघालेल्या एका एसटी बसेस टायरला फक्तं तीनच नट बोल्ट असल्याचे निदर्शनात आले. यावरून हे आगार प्रमुख किंवा सबंधित विभाग प्रवाशांच्या जिवाशी किती खेळत आहेत याच एक जिवंत उदाहरण मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केले.यावरून एसटी महामंडळ विभागाला जाग आली आहे…