महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड व जय किसान महिला शेतकरी संघटना यांच्या विद्यमाने शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत शिवलंका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष कृष्णा सोनावले यांच्या अध्यक्षतेखाली शिवलंका उत्पादक कंपनीचा दुसरा वर्धापन दिन व महिला हळदी कुंकू सोहळा माता रमाई बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्व संचालक मंडळांनी पुष्पहार अर्पण करून चवदार तळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला… कार्यक्रमाच्या सुरुवातीला सानिया निंबरे व समृद्धी पवार यांच्या स्वागत गीताने करण्यात आली… सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले व श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली… आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले… या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून समन्वयक बांबू विकास मंडळ नागपूरचे तुकाराम साळुंखे आरपीआय आठवले गटाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे महाड कृषी अधिकारी भरत कदम कृषी अधिकारी कोकरे, समीर मालगुणकर, कंपनीच्या उपाध्यक्ष श्रीमती अर्चना धाडवे, वासुदेव महाडिक, नथुराम निंबरे, मधुकर साळवे, शांता घाडगे, पूजा गायकवाड, निकिता मोकळे, परशुराम निंबरे, रामा निर्मळ, श्रीराम सकपाळ, सर्व संचालक व बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होत्या… यावेळी कृषी अधिकारी भरत कदम यांनी आलेल्या सर्व शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले… कंपनीचे अध्यक्ष कृष्णा सोनावले यांनी वर्धापन दिना विषयी संबोधित करताना सांगितले की तरुणी व तरुण वर्ग मुंबईला जाऊन नोकरी करण्यापेक्षा गावाकडे येऊन शेतीत लक्ष घातले तर खूप मोठे पीक घेऊ शकतात… तरुण वर्गाला सुसंस्कृत करण्यासाठी हा दुसरा वर्धापन दिन आम्ही करीत आहोत… कंपनीच्या उपाध्यक्ष श्रीमती अर्चना धाडवे यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानले व सांगितले की आम्ही कंपनीच्या वतीने महिला वर्गाचे बचत गट तसेच तहसील कार्यालयातील इतर कामे करून देतो व विविध योजनांचा फायदा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला उपयोगी पडतील अशा आम्ही त्याचा फायदा करून देतो… दुसऱ्या वर्धापन दिनाविषयी सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता रेवळेकर यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत म्हणून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भाग्यश्री आंबेकर कुमारी रुचिता जाधव सौ.रुपाली निर्मल वैजयंती शिगवण हर्षदा अंबावले संपदा उभारे मयुरी रेवाळे सुनीता मोरे व सर्व महिला कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली…