रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार ) :-
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ताराराणी ब्रिगेड संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वंदनाताई मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला…. चांभालीऀ येथील अशोक भाऊ मुंढे यांच्या फार्म हाऊसवर सोमवारी संपन्न झालेल्या शिवमती वंदनाताई मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी मोठ्या संख्येने उपस्थित होते….
सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करणाऱ्या शिवमती वंदनाताई मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला गडचिरोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश केदारी, कर्जत येथील शिव कामगार सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिकेत मते, जेएनपीटीचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर राज केळशीकर, लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव खवळे, काँग्रेस पक्षाचे नेते तथा चांभालीऀ ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक भाऊ मुंढे वरण विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख वैजयंती ठाकूर, समता परिषदेच्या संतोषी मोरे, काव्या मोरे, खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते शफीक अख्वास शेख, हनीफ ईय्याक शेख, मेहबूब शेख, एडवोकेट दीपाली पाटील आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते…