रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवभक्त आमदार म्हणून ज्यांची संपूर्ण राज्यामध्ये ओळख आहे असे गोरगरिबांचे कैवारी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३५१ राज्याभिषेक सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या धुमधडाक्यामध्ये संपन्न झाला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी होळीच्या मालावरून राज दरबारात आणण्यात आली… या ठिकाणी विधिवत पूजाअर्चा करत छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला… सदैव शिवकार्यात तत्पर राहणारे नामदार भरतशेठ गोगावले आवर्जून या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते… त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने शिवभक्त देखील उपस्थित होते…