उरण-जासई उड्डाणपुल व अपघात जणू समीकरणच… या उड्डाण पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात…

0
59

शिवसत्ता टाइम्स उरण (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यातील जासई उड्डाण पुलावर पुन्हा एकदा मोटारसायकलच्या भीषण अपघात सोमवारी पहाटे झाला… त्यामध्ये उरण बोरी येथील अनिश अनिल नायर, वय वर्ष २६ आणि अभिजीत अरविंद भुवड, वय वर्ष २० यांचा अपघात स्थळीच मृत्यू  झाला असून, सदर अपघात कशामुळे झाला याचे कारण आतापर्यंत स्पष्ट झालेल नाही..  मागील महिन्यात याच जासई उड्डाण पुलावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान डंपरने मोटारसायकलस्वाराला जबरदस्त धडक दिली… त्यात मोटारसायकलस्वार जबर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता….
सदर मोटारसायकलस्वार आयान  नेरेकर हा एसआयएस नेरुळ कॉलेजचा विद्यार्थी होता… उरण तालुक्यात अपघाताची  मालिका सुरूच असून, येथे सुसज्ज असे हॉस्पिटल नाही… अपघात रोखण्यात विद्यमान आमदार, खासदारांसह कुठल्याच राजकीय पक्षांना सोयरसुतक नाही… सदर माहीती मिळताच घटनास्थळी उरण वाहतूक पोलीस दाखल झाले… अधिक तपास पोलीस करीत आहे….