चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
ज्या प्रमाणे या ग्राम पंचायतचा विकास साध्य होत आहे, त्याच प्रमाणे कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या हितासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, येत्या काळात संबंधित मंत्री यांच्या बरोबर बैठक आयोजित करू असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.खालापूर तालुक्यातील ग्राम पंचायत वडवळ या ग्राम पंचायतीच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या सर्व समावेशक प्रगती ग्रामपंचायत करीत असून सर्वांचे अभिनंदन करून ग्रामपंचायत व कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या हितासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.आपल्या प्रास्ताविक भाषणात सरपंच द्यानेश्वर पवार यांनी ग्रामपंचायत यांनी केलेल्या व करणाऱ्या विधायक कामांची माहिती देऊन ग्रामपंचायत वडवळ यांनी स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त केला असल्याचे सांगितले.सुमारे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून ग्राम पंचायत निधीतून ही प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद पाटील व सदस्य यांनी इमारत उभी करण्यासाठी केलेल्या कामाची प्रशंसा उपस्थीत सर्वांनी केली.यावेळी सर्व माजी सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच द्यानेश्वर पवार,उपसरपंच सौ.प्रमिला मरागजे,गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी,ग्राम पंचायत अधिकारी प्रमोद पाटील,सर्व ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी सभापती उमा मुंढे,कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे नेते व माजी सरपंच विष्णू सकपाळ ,एम.डी.चाळके,अंकित साखरे, विष्णू सावंत, आनंद मरागजे, शुभम सकपाळ, माजी सरपंच जितू सकपाळ, माजी उपसभापती उत्सला मोरे, माजी सरपंच विठ्ठल मोरे, अंकित साखरे, संतोष बैलमारे, गुरुनाथ साठेलकर यांच्यासह पाच गाव वडवळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन जगदीश मरागजे यांनी केले.