वंजारवाडी येथे खड्डे भरण्याचे काम सुरू… पावसाळ्याआधीच वंजारवाडीत भले मोठे खड्डे…

0
11

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-  

राष्ट्रीय महामार्ग कर्जत कशेळे क्रमांक 548A (NH 548A) चा एक भाग आहे…वंजारवाडी या गावाजवळ भले मोठे खड्डे पावसाळ्याआधीच पडले होते…परंतु हे खड्डे ठेकेदार यांनी बुजवले नसून त्यावर अंकुश ठेवण्यास राष्ट्रीय महामार्ग व प्रशासन करत असल्याचे आरोप स्थानिकाने करीत आहेत…

राष्ट्रीय महामार्गावर वंजारवाडी भागात खूप वेळा अपघाताची मालिका सुरू आहे… गेले दोन-तीन दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण रायगड जिल्हा असताना कर्जत तालुक्यामध्ये सतत पाऊस आहे…परंतु दिनांक २९ रोजी सकाळ ते दुपार पाऊस झाला नाही तेथील ठेकेदार यांनी याअधि रस्ता तर पूर्ण केला परंतु देखभाल म्हणून आठ वर्ष त्याची निगराणी राखायचे काम त्यांच्याकडे आहे असे ठेकेदार कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतः सांगितले आहे…

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी वाहन चालकाच्या लक्षात येत नसून वारंवार अपघात होत आहे…परंतु ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग / प्रशासन कुठेही लक्ष घालत नाही असे चित्र समोर येत आहे व अपघाताची मालिका सुरूच आहे…आज देखील काम करण्यात आले परंतु व सब ग्रेड टाकाचे काम चालू होते पण हया मधे चक्क मातीच दिसत आहे…कंपनीचा नंबर मागितला असताना ठेकेदाराने माझ्याकडे नंबर नाही असे सांगितले..

रस्त्याच्या बाजूला गटारे का केली नाहीत यावर त्यांनी सांगितलं की सरपंच यांनी विरोध केला आहे म्हणून गटारे बनवली नाहीत.. राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे लक्ष देईल का ?हे पाहण तितकेच महत्वाचे ठरणार आहे…